Harsshit Abhiraj's Musical Journey

Harsshit Abhiraj’s Musical Journey has appeared in many newspapers, magazines which wrote about him and his work in the music field. Harsshit Abhiraj is a Music Composer, Music Director, Playback Singer, Stage Performer, Stage Presenter and actor.

Harshit Abhiraj's Musical Journey. Sakal Newspaper Article on Neharu Stadiumchya Kothitala Sangeetweda Bhugasheth.

नेहरू स्टेडियमच्या कोठीतला संगीतवेडा भुगाशेठ' हर्षित अभिराज

इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर इंटेरिअर आणि मैनैजमेंटवा कोर्स केला. नंतर पार्श्वनाथ डिग्रजकर गुरुजीचे शिष्य सुरेश वाडकर यांच्या काही कार्यक्रमांत, रेकॉर्डिंगमध्ये कोरसमध्ये गाण्याची संधी
मिळाली; पण गुरूनी सांगली सोडून पुणे किंवा मुंबईला जाण्याचा सल्ला दिला. पुण्यात आल्यावर पार्टाइम नोकरी मिळाली. नेहरू स्टेडियम च्या कोठीमध्ये राहायला जागा मिळाली सकाळी नौकरी, संध्याकाळी गाण्याच्या मैफली आणि आकाशवाणी. शनिवार-रविवार मुंबई, असा दिनक्रम सुरू झाला. कधी एक
वेळ जेवण, कधी नेहरू स्टेडियमजवळ हातगाड्यांवरील वड्याचा उरलेला भुगा आणि पाव, असे प्रसंग माझ्या पोटाने अनेकदा अनुभवले. याचे साक्षीदार जितू आणि सुनील वाईकर हे आजही भेटतात ते मला ‘भुगाशेठ चिडवत असत. पुढे आकाशवाणीमध्ये कोरसमधून गाऊ लागलो. नंतर मंगेश वाघमारे या मित्राच्या मदतीने ‘मुंबई सिंगर असोसिएशन चं कार्ड मिळालं. कोरस सिंगरची काम मिळू लागली. माझ्या गीतरचनांना सीडी किंवा कसेटचं कोंदण मिळण्यासाठी माझी घडपड सुरूच होती. गझलकार इलाही जमादार यांच्यामुळे ती पूर्ण झाली. निशिगंध च्या गायिका आशा भोसले यांच्याशी एकदा भेटण्याचा योग आला. मला कंपोजर व्हायचं आहे. अशी इच्छा मी त्यांना बोलून दाखविली होती. त्यानी दिलेला कानमंत्र जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगो पडतो आहे. शांताबाई शेळके, ना धों महानोर, गंगाधर महांवरे, इलाही जमादार यांच्याकडून साहित्याच ज्ञान मिळण्याचं भाग्य मला मिळालं. गाण्यांच्या आल्बमची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती.
पण त्यासाठी बराच पैसा लागणार. आईला कुठून तरी समजलं, तिने आयुष्यभर साठवलेली पुंजी माझ्या हवाली केली. पुणे या सर्व घटनांच साक्षीदार आहे. माझ्या जीवनप्रवासात मला पुण्याने खूप दिलं. घडवले असंच म्हणेन, या शहराने मोठ्या साहित्यिकांचा सहवास दिला. टीका झाली. ती सहन करण्याची ताकद दिली
आणि बरच काही.
शब्दांकन: संतोष शाळीग्राम

वडिलांच्या निधनानंतर सावरण्यासाठी सुरु झालेला संघर्ष आजही चालू 

घरात  संगीत आहेच. आजोबा उत्तम भजनकार होते. त्यानंतर वडिलांकडे तो वारसा आला. सांगलीत कृष्णकाठी या दोघांचं सानिध्य मिळाल होतं. त्यामुळे न कळत्या वयापासून संगीताचा संस्कार झाला. भजन गुणगुणायला लागल्यानंतर वडिलांनी माझ्यातली कला जोखली. त्यांनी मलानवी पेटी घेऊन देण्याचा शब्द दिला होता. पण तेव्हाचा काळ फार सधनतेचा नव्हता. पेटी मिळणार, या कल्पनेनं मी आनंदून, भारावून गेलो होतो; पण काही दिवसांतच नियतीनं हा आनंद माझ्यापासून हिरावून घेतला. वडलांचं अचानक निधन झाले. छत्र हरपल, परवड़ सुरू झाली. त्यातून सावरण्यासाठी सुरू झालेला संघर्ष आजही सुरू आहे.

पेटी घेऊन देऊ या वडलांच्या शब्दांमधला नाद माझ्या कानात आणि मनात घुमतो आहे. त्यामुळच संगीत हे माझे जगणं बनून गेलंय, वडील गेल्यानंतर कोटुंबिक वाताहत झालेली होती. त्यामुळ संगीताशी जोडली गेलेली नाळ तुटते की काय, अशी अवस्था आली. संगीताचं वेड घेऊन वावरण्या पेक्षा कुटुंबाची गरज ओळखून जगावं, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली. घरात पैशांची आवकही कमी झालेली होती. शाळेत संगीताची स्पर्धा असली, तर त्यासाठी असलेलं नाममात्र शुल्क देखील मिळेनास झालं.

पण वडिलांच्या साथीने नव्याने गायलेली भजनं शाळेतील अनेक शिक्षकांनी ऐकलेली होती, त्यामुळे त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळत राहीलं. सांगलीजवळ औदुबर है गाव आहे. तेथे भजन गायनाचे कार्यक्रम होत असत. चौदा वर्षांचा असताना या गावात स्वतः स्वरबद्ध केलेल भजन गायल होत. त्या वेळी कवी सुधांशू यांनी पाठीवर कौतुकाची थाप दिली. आत्मविश्वास दुणावला, अशातच चिंतूबुवा म्हैसकर आणि पार्श्वनाथ डिग्रजकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरू झाल होतं. सांगली आणि आजूबाजूच्या परिसरात सांगीतिक कार्यक्रम असेल, तेथे माझी हजेरी ठरलेली असायची. धनगरी ओव्या, भेदिक, करवल अशा अनेक कार्यक्रमांमध्ये संगीत सेवा रूजू केली. त्याच फळ  म्हणून की काय, आज चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून वाटचाल सुरु झालेली आहे.

शब्दांकन: संतोष शाळीग्राम

Harsshit Abhiraj's Musical Journey. Sakal Newspaper Article on Deccan Queen Madhun Durachya Ranat.

'डेक्कन क्वीन' मधून दूरच्या रानात

पुण्यात नोकरीत असताना त्या कंपनीनं मला मुंबईमधील कामांची जवाबदारी दिली. त्या वेळी डेक्कन क्वीन ठरलेली असायची. अनेक कलाकार, नोकरदार, व्यावसायिक सहप्रवासी होती. पॅन्ट्रीकारमध्ये लोक भेटायचे. गप्पा व्हायच्या. एक दिवस गाडीत माझी एक रचना गुणगुणत होतो. समोर बसलेले गृहस्थ ऐकत राहिले. जरा वेळाने त्यांनी बोलायला सुरुवात केली, तुम्ही गायलेलं गाणं कोणत्या चित्रपटातलं आहे?” मी म्हटलं, “नाही. माझीच रचना आहे. शब्द ना. धों. महानार यांचे आहेत.” त्यांनी बरीच तपशिलानं माहिती घेतली. मला कळेना हा माणूस एवढा का विचारतोय ते. मी जरा रागानं विचारलं, “का हो, कशाला पाहिजे एवढी माहिती? त्यावर ते म्हटले , “मी एका कॅसेट कंपनीचा मालक आहे. माझ्या एका आल्बमसाठी तुम्ही ही रचना द्या.” माझा क्षणभर विश्वास बसला नव्हता.

पुढ याच सुभाष परदेशींमुळे महानोरांच्या गीतांची सीडी तयार झाली. सर्व गीतांना माझे संगीत होतं. सुरुवातीला चालीवर टीका झाली, पण जिद्द सोडली नाही. पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूरसह महाराष्ट्रातील सर्वच एफएम आणि आकाशवाणी केंद्रांना ही सीडी दिली. पुढे हे गाणं एवढं लाकप्रिय झालं, की माबाईल सेवा पुरवणाऱ्या अनेक कंपन्यांद्वारा साधारण दोन लाख नागरिकानीं हे गाण कॉलर ट्यूनसाठी डाऊनलाड केले आहे. महाराष्ट्राच्या रौप्यमहात्सवी वर्षात शेतक-्यांचं प्रतिनिधित्व करणार काव्य म्हणून ‘दूरच्या रानात ची शासनाने निवड केली होता. आता राज्याच्या सुवर्णमहात्सवी वर्षात हे गाणं लाकप्रिय झाल. हा एक योगायोगच म्हणावा लागेल. हे गाणं लोकप्रिय झाल्यानंतर ‘माझ्या काव्यसंपदेचं चीज झाले अशो महानोरांकडून मिळालेली दाद म्हणजे आजही ‘ऑक्सिजन सारखी वाटते. हे काव्य अनेक लावण्यांच्या शोजमध्ये सादर केलं जातं. साता समुद्रापलीकडे या

गाण्याचे चाहते आहेत. डेक्कत क्वीनमध्ये सुरू झालनला दूरच्या रानात चा प्रवास आज रसिकांच्या परापरात, मनामनात पोचलाय, यापेक्षा वेगळा आनंद काय असणार?

(क्रमशः)
शब्दांकन: संतोष शाळीग्राम

Harshit Abhiraj's Musical Journey. Sakal Newspaper Article about part time job.

शिकताना पार्ट टाईम नोकरीमुळे संगीताची जोपासना सुकर झाली

शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत म्हैसकर आणि डिग्रजकर बुवांनी संगीताचा शास्त्रीय पाया भक्कम करून घेतला होता. असं असूनही पूर्ण वेळ संगीत हा मार्ग निवडता येणार  नव्हताच. कारण संगीत हे उदरनिर्वाहाच साधन होऊ शकेल, अशी घरातील कुणाचीच धारणा नव्हती. त्यामुळे अभियांत्रिकी शिक्षणासाठी कऱ्हाड गाठावं लागलं. करिअरचा मार्ग बदलणार होता. मनात घालमेल होत होती. मग निश्चय केला, की इंजिनिअर तर व्हायचं; पण ‘साग्रसंगीत, जमेल तस  बेगवेगवेगळ्या संगीत प्रकाराचं ज्ञान आत्ममात करीत होतो. वाद्यवृन्द ,म्युझिक
क्लब, फिल्म क्लब आणि अभियांत्रिकीचा अभ्यास, असा समतोल करून माझा प्रवास सुरू होता. अर्थातच घरातून मिळाणारया तुटपुंज्या आधारावर. त्यामुळ एका बांधकाम व्यावसायिकाकडे पार्टटाटम नोकरी करू लगलो. यातून संगीताचीजोपासना सुकर झाली होती. आर्थिकबळ मिळाल्यानं सांगीतिक कार्यक्रम,एकांकिका स्पर्धा, पथनाट्यांची निर्मिती करता आली. त्याला संगीत देण्याची संधी मिळाली. कवितांना चाली लावण्याचा छंद लागला.त्या चालींच कौतुक होऊ लागलं. कऱ्हाडमध्ये  असंख्य लोकानी आधार दिला. माझं सांगीतिक विश्व समृद्ध करण्यास मदत केली, यातून कलाक्षेत्रात नक्कीच काहीतरी नवे करता येईल, असा आत्मविश्वाम निर्माण झाला, कॉलेजमधले दिवस मंतरलेले हाते. बऱ्या
-वाईट अनुभवांच मोठ संचित या काळात जमा झालेल होत. ही शिदोरी माझ्या पुढील प्रवासात खूप काही देणारी होती. पुढे जायचं तर कन्हाडमध्ये राहून चालणार नव्हतं, म्हणून मग मुंबई- पुण्याची वाट धरण्याचा विचार मनात घर करू लागला होता.

(क्रमशः) शब्दांकन : संतोष शाळीग्राम